राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निःशुल्क रक्त गट तपासणी शिबिर आयोजित

Tue 07-Oct-2025,11:18 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा-नगर पंचायत क्षेत्रातील आमगाँव खुर्द सालेकसा येथे धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते उमंग बंसोड व धन्वंतरी क्लिनिकल लॅब सालेकसा यांच्या संयुक्त तत्वधानाने नागरिकांसाठी निःशुल्क रक्त गट तपासणी शिबिर आयोजित करण्यात केले. ज्याच्या मध्ये महिला, वरिष्ठ नागरिक, युवा यांनी मोठा प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सुरू करण्यात आले. ह्या कार्यक्रमात प्रमुख रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा महासचिव डॉ. हिरालाल साठवणे, किसन रहांगडाले, शहर अध्यक्ष ब्रजभूषण बैस, अंजली हटवार बनोठे, रवी चूटे, बाबूलाल कटरे, धन्वंतरी क्लिनिकल लॅब सालेकसा चे संचालक नरेंद्र कुमार नागपुरे,डॉ.चौरागडे, जितेंद्र दमाहे, अमित आणि त्यांची चमू प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उमंग बंसोड, स्वप्नील बोंबर्डे, सुमित शेंडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.